मुंबईत मराठा आरक्षण आंदोलकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ता सुनील बाबूराव कावळे (४५) यांनी बुधवारी मध्यरात्री वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सुनील कावळे यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रहिवासी असलेले कावळे यांच्याकडील बॅगेत ‘सुसाईड नोट’ सापडली असून खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढीलकारवाईसाठी मृतदेह सायन रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांडे-पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू असतानाच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील माडज येथील एका मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी गावातील शिवकालीन वैजनाथ महाराज तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. अशा प्रकारे आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ४८ हून अधिक तरुणांनी आत्महत्या केल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी म्हटले आहे. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी लढा उभारला आहे. त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारला आरक्षणावर विचार करून कृती करण्यासाठी दिलेली मुदत संपत आली आहे, सरकार कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच आरक्षणाचा निर्णय घेण्यात यावा, याकडे सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने कावळे यांनी गावाकडून मुंबईत येऊन भररस्त्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या आंदोलनाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.