मँगो मस्तानी

0

लोकशाही विशेष लेख

 

गर्मी के मौसम मे आम नहीं खाया तो क्या खाया।

आंब्याचा सिझन आणि आपण काही बनवणार नाही असे कसं… फळांचा राजा म्हणजे आंबा आणि तो वर्षातून एकदाच मिळतो, मग आंबा नाही खाल्ला तर वर्ष असेच फुकट जाणार. तुम्हाला मिळाले की नाही आंबे? मी तर आणले आणि खूप प्रकारच्या रेसिपी सुद्धा केल्या. दरवर्षी आंब्यांची वाट पहात असतो. तुमच्या लक्षात आलेच असेल की, आपण काहीतरी आंब्याची रेसिपी बनवणार आहोत.चला तर मग मँगो मस्तानीच (Mango Mastani) बनवूयात..

मँगो मस्तानी (Mango Mastani)

नावातच सर्व आहे.. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या मँगो मस्तानीला इतिहासदेखील आहे बरं का. बाजीराव – मस्तानीच्या काळात यामध्ये अंडी वापरून बनवले जायचे. हो खरं आहे हे! परंतु आता मँगो मस्तानी ही ताज्या फळांपासून बनवली जाते आणि यामध्ये अनेक प्रकार पहायला मिळतात जसे की, वेनीला मस्तानी, आँरेंज मस्तानी, पिस्ता मस्तानी, सीताफळ मस्तानी, गुलाब मस्तानी इ. चला पटकन बनवुया मँगो मस्तानी……

साहित्य:
हापूस आंबा गर २ कप, दूध २ कप ( फॅट मिल्क चालेल), ४ कप वेनीला आईस्क्रीम, साखर २/३ चमचे, ५/६ बदाम, ५/६ पिस्ता, १०/१२ ग्लेझ्ड चेरी, रोझ सिरप २ चमचे, सबजा बी २ चमचे.

कृती :
१) प्रथम बदाम, पिस्ता बारीक कापून घ्या, सबजाचे बी पाण्यात भिजवून ठेवा.
२) थोड्या आंब्याचे चौकोनी तुकडे करून ठेवा.
३) आंब्याचा गर काढून मिक्सरमध्ये घ्या, (यातील १/२ चमचे बाजूला काढून ठेवा, ग्लासमध्ये सेट करण्यासाठी) दोन चमचे साखर आणि थंड दूध घालून मिक्सरमधून फिरवून घ्या.
४) याच मिश्रणात २ कप आईस्क्रीम घालून परत मिक्सर मधुन फिरवून घ्या.
५) मँगो शेक तयार करून आता ते ग्लासमध्ये सेट करून घ्यावे.
६) एका काचेच्या ग्लासमध्ये रोझ सिरप १ चमचा घालून त्यावर साधा आंब्याचा गर घालावा. आता १ चमचा सब्जा घालावे.
७) त्यावर एक ते दिड कप मँगो शेक घालावे आणि आईस्क्रीम स्कूप (शक्यतो मॅंगो फ्लेवर मधलं असावं), खालून वरतून बदाम, पिस्ते, रोज सिरप, ग्लेझ्ड चेरी, आंब्याचे चौकोनी तुकडे घालून खाण्यासाठी तयार मँगो मस्तानी द्यावे.

मस्त मस्त मस्तानीचा आस्वाद घ्या तेही घरच्या घरी..

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे
९८९२१३८१३२
पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.