मांगल्य सेवा संस्थेतर्फे शाळेत मास्क भेट

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोना लाट ओसरत असल्याने शासन निर्देशानुसार नुकत्याच सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. त्यानिमित्ताने मांगल्य सेवा संस्थेतर्फे मातोश्री. कै. सौ. माधुरी धोंडोपंत कुळकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ जळगाव संचलित माध्यमिक विद्यालय, शारदा कॉलनी येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मास्क भेट देण्यात आली.

ही भेट किरण धोंडोपंत कुळकर्णी आणि प्रवीण धोंडोपंत कुळकर्णी यांच्यातर्फे देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.