ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार थंडावला

0

 

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

 

ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराचा गेल्या महिन्यापासून उडालेला धुराळा शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपुष्टात आला असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे प्रशासनाचीही तयारी पूर्ण झाल्याने शनीवारी मतदान केंद्रांवर साहित्य रवाना होणार आहे.

मागील गेल्या सात ते आठ महिन्या पूर्वी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यात २५ ऑक्टोबर रोजी माघारीसाठी मुदत देण्यात आली होती. तालुक्यात नामांकन अर्ज दाखल करतेवेळीच दोन ते तीन ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंचांची बिनविरोध निवड करण्यात आली होती मात्र काही ठिकाणी उमेदवार शिल्लक राहिले आहेत. सरपंचपदासाठी देखील जनतेतूनच निवड करण्यात येणार असल्याने त्यासाठीदेखील रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजीच मतदान घेण्यात येणार आहे. त्यात साकळी येथील संरपच पदासाठी ४ उमेदवार तर सदस्य साठी ४२ रिंगणात आहेत,थोरगव्हाण येथे दोन महिला उमेदवार रिंगणात आहे तर शिरागड – पथराडे गृप ग्रामपंचायत सरपंच करीता तीन उमेदवार भाग्य अजमावत आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील 2 हजार ३५९
ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी ०५ नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता रविवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. या निवडणुकीचा निकाल ०६ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडिया सुद्धा प्रभावीपणे वापर प्रचारात करण्यात आला आहे. दुसरीकडे, पंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने प्रचारामध्ये प्रत्येक गावात महिलांचा सुद्धा मोठा सहभाग दिसून आला.

Leave A Reply

Your email address will not be published.