शेगाव येथील ओबीसीचा भव्य मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – आ.राजेश एकडे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापु :-शेगांव ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि आपल्या इतर मागण्यांच्या संदर्भात ओबीसी अधिकार संघर्ष समितीच्या वतीने शेगाव येथे दि.२८ मार्चला अकोला वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील समाज बांधवांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल व ओबीसीचे केंद्रीय नेते हार्दिक पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना.यशोमती ठाकूर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण स्थगित केले आहे. यामुळे ओबीसींचे राजकीय  प्रतिनिधीत्व संपुष्टात आले. तसेच वैद्यकीय प्रवेशाचा कोटाही स्थगित करण्यात आला. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, नगरपालिका, मनपा यातील ५६ हजार

हजार लोकप्रतिनिधींना याचा फटका बसला.

यावर विचारमंथन करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील ओबीसी शाखेकडून राज्यात ठिकठिकाणी ओबीसींसाठी सामाजिक महामेळावे आयोजित करण्यात येत आहेत. याअंतर्गत दि.२८ मार्च रोजी संतनगरी शेगांवात अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसींकरिता सामाजिक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षणासाठी होत असलेल्या शेगाव येथील मेळाव्याला अकोला, बुलढाणा, वाशीम या तीन जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस चे आ.राजेश एकडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.