अनिष्ठ रूढींना फाटा देत वडिलांच्या चितेला मुलीने दिला मुखाग्नी

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अनिष्ठ रूढी आणि पंरपरेला फाटा देत वडीलांच्या मृत्यूनंतर चितेला मुलीने मुखाग्नी देत समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

आजही आपल्या समाजात अनिष्ठ रूढी परंपरा आहेत. आजच्या युगात मुलींनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. तरी देखील बुरसटलेल्या विचारांची लोकं मुलींना कमी समजतात. मुलीच झाल्या म्हणून छळ करतात. मुलगा हा वंशाचा दिवा असतो, आई वडिलांच्या चितेला मुलाने मुखाग्नी दिल्याशिवाय त्यांना मोक्ष मिळत नाही अशा कुचित विचारसरणीचे लोकं आजही समाजात वावरतांना दिसतात. याच बुरसटलेल्या विचारांना फाटा देत वडीलांच्या मृत्यूनंतर चितेला मुलीने मुखाग्नी देऊन समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.

मलकापूर  शहरातील सालीपुरा भागातील रहिवाशी विनायक प्रकाश आसलकर (वय ३८) यांचे ९ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना एकमेव मुलगी असल्याने अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार कसे पाडावे असा प्रश्न उभा ठाकला असता, घरातील व समाजातील मंडळींनी मुलीला अग्नीसंस्कार करण्यास पुढे केले. त्यावेळी विनायक आसलकर यांची मुलगी ममता हिने वडीलांच्या अंत्यसंस्कारावेळी निघालेल्या प्रेत यात्रेत टिटव पकडण्याबरोबरच वडीलांच्या चितेला मुखाग्नी दिला.

रूढी, परंपरा व अनिष्ठ प्रथा बाजूला सारीत मुलीने वडिलांच्या चितेस मुखाग्नी देत समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. स्व. विनायक प्रकाश आसलकर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.