तिळाला मकर संक्रांतीमध्ये का महत्व असते ? जाणून घ्या सूर्य आणि शनीची रंजक माहिती

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे. मकर संक्रांतीत तिळाला अधिक महत्व असते. संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. या तिळाला का महत्व आहे हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा हि रंजक कथा ..

एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतः पासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्यांने सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला. त्या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग ग्रस्त झाला. वडिलांना या त्रासात बघून यमराज (हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्याचे पुत्र होय). यांनी तपश्चर्या केली. त्या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगांपासून मुक्त झाले.

सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छाया देवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर(कुंभ- ही शनीची रास आहे) जाळून टाकले. त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला.

यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावया त्यांचा घरी गेले. कुंभ ला पेटविल्यावर फक्त काळे तिळांना सोडून सर्वे काही जळाले होते. त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर ‘मकर’ दिले.

त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनी देवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्व आहे.

तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात. असे मानले जाते की, तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती, त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखी वाढते. सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.