हॉकी विश्वचषकाचा उद्यापासून थरार रंगणार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताच्या यजमानपदात चौथ्यांदा हॉकी विश्वचषक शुक्रवार म्हणजेच उद्यापासुन 13 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. ओडिशातील राउरकेला आणि भुवनेश्वर येथे विश्वचषक स्पर्धेची 15 वा हंगाम खेळवला जाणार आहे.

या हॉकी विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होत असून त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. या विश्वचषकात एकूण 44 सामने खेळवले जाणार आहेत. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कमान हरमनप्रीत सिंह सांभाळत आहे. सर्वाधिक 14 वेळा विश्वचषक खेळलेली टीम इंडिया 48 वर्षांपासून दुसऱ्या विजेतेपदाच्या शोधात आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर आणि 2021-22 FIH प्रो हॉकी लीगमध्ये तिसरे स्थान मिळवल्यानंतर, यावेळी टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये पदक जिंकू शकेल अशी आशा आहे. सुरजित सिंह रंधावा आणि अशोक कुमार यांच्या गोलच्या जोरावर टीम इंडियाने 1975 मध्ये शेवटच्या वेळी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करून विश्वचषक जिंकला होता. टीम इंडियाने 1971 मध्ये कांस्य पदक आणि 1973 मध्ये रौप्य पदक जिंकले होते.

हॉकी विश्वचषक स्पर्धेत चारही गटांतील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. त्याच वेळी, सर्व गटांमधील द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे संघ क्रॉसओव्हर फेरी खेळतील. क्रॉसओव्हर सामन्यातील विजयी संघ उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करतील. उपांत्यपूर्व फेरीत विजयी होणारे संघ उपांत्य फेरीत खेळतील. 27 जानेवारीला उपांत्य फेरीचे दोन सामने होणार आहेत. उपांत्य फेरीतील विजेते संघ 29 जानेवारी रोजी भुवनेश्वर येथे सायंकाळी 7 वाजता अंतिम सामना खेळतील. 29 तारखेलाच तिसऱ्या क्रमांकाचा सामना खेळवला जाईल. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांदरम्यान, 5व्या ते 16व्या क्रमांकावर असलेल्या संघांचे सामनेही होणार आहेत.

टीम इंडियाचा सामना कधी होणार

टीम इंडिया विरुद्ध स्पेन – 13 जानेवारी, संध्याकाळी 7 वाजता

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड – 15 जानेवारी, संध्याकाळी 7 वाजता

टीम इंडिया विरुद्ध वेल्स – 19 जानेवारी, संध्याकाळी 7 वाजता

यावेळी टीम इंडिया ग्रुप-डी मध्ये इंग्लंड, स्पेन आणि वेल्ससोबत आहे. यापैकी फक्त इंग्लंडचा संघ FIH क्रमवारीत भारतापेक्षा वर आहे. टीम इंडिया सहाव्या तर इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. स्पेन आठव्या आणि वेल्स 15व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना 13 जानेवारीला स्पेनशी, दुसरा सामना 15 जानेवारीला इंग्लंडविरुद्ध आणि तिसरा सामना 19 जानेवारीला वेल्सशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.