जी. एच. रायसोनी महाविद्यालयात उद्या “इनोव्हेशन टेक्नोलॉजी अँड इंटर्नशिप”वर राष्ट्रीय परिषद

0

 लोकशाही न्यूज नेटवर्क

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग या आठवड्यात (10 ते 16 जानेवारी) स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करीत असुन आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात उद्योजक आणि भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम सक्षम करणाऱ्यांसाठी ज्ञान शेअरिंग सत्रे असतील. स्टार्टअपशी संबंधित कार्यक्रम देशभरात अनेक ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत.

या अनुषंगाने १३ जानेवारी रोजी “मॅजिक अक्टीव्हिटी- माय स्कील माय बिजनेस” या विषयावर आधारित, येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात एमबीए विभागाच्या वतीने “इनोव्हेशन टेक्नोलॉजी अ‍ॅन्ड इंटर्नशिप ” या प्रमुख विषयावर उद्या शुक्रवार ता. १३ जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत असून परिषदेत शिक्षण विभागातून प्राध्यापक, रिसर्च स्कॉलर, विद्यार्थी व उद्योग क्षेत्राशी संबंधित संशोधकांनाही संशोधन सादर करता येणार आहे.

आयोजित परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून रायगड येथील डीआरटी-अँथिया अरोमा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहाय्यक व्यवस्थापक गणेश कासार, औरंगाबाद येथील मराठवाडा एक्सीलरेटर फॉर ग्रोथ अँड इनक्युबेशन कौन्सिल (मॅजिक) चे जॉइंट सीईओ निखिल कुलकर्णी व ग्राउंडअप टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि सहसंस्थापक अमेय देशपांडे तसेच परिषदेचे प्रमुख संयोजक रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. या राष्ट्रीय परिषदेत नवोपक्रम आणि उद्योजकता इनोव्हेशन, डिझाइन थिंकिंग, कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन, स्टार्ट-अपसाठी इकोसिस्टम, डिजिटल सोशल इनोव्हेशन, तंत्रज्ञानाद्वारे सामाजिक मूल्य निर्मिती प्रकल्प व्यवस्थापन, मार्केट इनोव्हेशन, उत्पादन नवकल्पना आणि विकास, डिजिटल मार्केटिंग, ब्रँड व्यवस्थापन यासह विविध विषय हाताळले जाणार असून या परिषदेत एम.बी.ए विभाग व ई.कॉमर्स क्षेत्राशी निगडीत संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी, प्रा. डॉ. मोनाली शर्मा व प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. तन्मय भाले, प्रा. श्रीया कोगटा व आदी परिश्रम घेत आहेत.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.