जुन्या स्थापत्यशास्त्राचा पुन्हा अभ्यास व्हावा : डॉ. अविनाश कुलकर्णी

आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल, अध्ययन विमानसेवा व्हावी : डॉ. उमेश वाणी

0

स्वप्नातील जळगाव

जळगाव शहराचा विकास व्हावा हे सर्वांनाच वाटतं. मात्र जळगावच्या आकाराचा आणि त्यांच्यातील इमारतीच्या आकाराचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार होणं गरजेचं आहे. जुन्या प्रभावी अशा स्थापत्य शास्त्राचा पुन्हा अभ्यास केला जाऊन नव्या इमारतींची निर्मिती व्हावी. यातून इमारतींना एक सात्विक ऊर्जा प्राप्त होईल. जुन्या काळातील स्थापत्यशास्त्रानुसार बांधलेलं नालंदा विद्यापीठ किंवा इतर शहरांच्या निर्मितीने आदर्श निर्माण केला आहे. त्यानुसार आपण ज्या प्रशासकीय इमारतीतून जळगावचा कारभार चालवतो त्या सतरा मजली महानगरपालिकेच्या इमारतीच्या देखील आकाराचा अभ्यास व्हावा. जळगावचा विकास लवकर साधला जाईल. जर इमारतीच्या प्लॅनिंग मध्ये चूक असेल तर पुढे अनेक त्रुटी निर्माण होतात, असं शास्त्रात सांगितलेला आहे. त्यानुसार जर खऱ्या अर्थाने विकास आवश्यक असेल तर या त्रुटी टाळून विकास होणे गरजेचे आहे. यासाठी आधार ठरेल आपलं जुनं स्थापत्यशास्त्राचे ज्ञान. त्या माध्यमातून जळगावचा विकास आणि स्वप्नातलं जळगाव साध्य करणे सोयीस्कर होईल, अशी माहिती वास्तु आरोग्यमचे संचालक वास्तुशास्त्र तज्ञ डॉ. अविनाश कुलकर्णी यांनी लोकशाहीच्या कार्यालयात दिली.

ते श्री गणरायाच्या आरतीसाठी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले मी याच क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे मी माझी भूमिका बजावताना देखील या दिशेने आवश्यक ती कोणतीही मदत करायला तयार राहील. याबाबतच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी मी माझे योगदान देईल. जेणेकरून स्वप्नातील जळगावच्या विकासात मी काहीतरी हातभार लावू शकेल.

यावेळी स्वप्नातील जळगाव या संकल्पनेबद्दल मत मांडताना समाजशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. उमेश वाणी म्हणाले, जळगाव शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल निर्माण व्हावे. त्याचप्रमाणे अव्यहातपणे दिली जाणारी विमानसेवा ही देखील जळगावच्या विकासाला फार मोठे योगदान देईल. सोबतच नागरिकांनी निवडणुकीत योग्य निवड करून आपले प्रतिनिधी नेमावे, जेणेकरून जळगावच्या विकासात कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही. या प्रकारच्या प्रयत्नांतून जर आपण जळगावचा विकास केला तर लवकरच स्वप्नातील जळगाव आपल्यासमोर उभं राहील, अशी प्रतिक्रिया प्राध्यापक डॉ. उमेश वाणी यांनी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले याबाबतीत समाजात जनजागृती करण्यासाठी मी माझ्या शिक्षकी पेशातून नेहमीच तयार राहील. जेणेकरून जळगावच्या स्वप्नातील जळगावच्या विकासाला अधिक चालना देता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.