जुन्या भांडणावरून महिलेच्या घरातून अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील रचना कॉलनी येथे जुन्या भांडणावरून महिलेच्या घरातील रोकडसह सोन्याची मंगलपोत व दागिने असा अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील रचना कॉलनी येथे राहणाऱ्या आशाबाई गोपाल चौधरी (वय ४२) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १५ मार्च रोजी पहटे ३ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून सुनील रसाळ राठोड, संजय रसाळ राठोड रा. कासमवाडी, विशाल पदमसिंग परदेशी रा. कुसुंबा आणि रुपेश संजय सपकाळे रा. कांचन नगर यांनी महिलेच्या घरात प्रवेश मारहाण केली व घरातील सामानांची तोडफोड केली. तसेच महिलेच्या घरात ठेवलेले १ लाख रूपयांची रोकड आणि सोन्याची मंगलपोतसह सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी सुनील राठोड, संजय राठोड दोन्ही रा. कासमवाडी, विशाल पदमसिंग परदेशी रा. कुसुंबा, रुपेश संजय सपकाळे रा. कांचन नगर, गणेश भास्कर सोनार, अविनाश रामेश्वर राठोड, रा. रेणुका नगर मेहरूण जळगाव आणि ललीत उमाकांत पाटील रा. इश्वर कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यता आला असून त्यांना सोमवार २८ मार्च रोजी जैनाबाद परिसरातून अटक केली.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या माहितीवरून सपोन प्रमोद कटोरे, सफौ अतुल वंजारी, किरण पाटील, प्रदीप पाटील, मुकेश पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी केली. याप्रकरणी दोन्ही संशयितांना मंगळवारी २९ मार्च रोजी न्यायमूर्ती शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.