विवाहितेला मारहाण करून विनयभंग; दोघांवर गुन्हा दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव येथे एका भागात राहणाऱ्या ४० वर्षीय विवाहितेला मारहाण करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव शहरातील एका भागात ४० वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहते. संशयित आरोपी अमोल दगा पाटील आणि गणेश दगा पाटील दोन्ही रा. भडगाव यांनी महिलेच्या घरात बसून तिला लोखंडे सळईने हातावर बेदम मारहाण केल्याने हाताची करंगळी फॅक्चर झाली आहे. दरम्यान एकाने शिवीगाळ करून ‘तू बाहेर भेट तुला उडवून देऊ’, अशी धमकी दिली. यातील एकाने महिलेचा विनयभंग केला.

याप्रकरणी महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अमोल दगा पाटील, गणेश दगा पाटील यांच्या विरोधात भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पांडुरंग सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.