भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथील दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली असून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१९) रोजी संध्याकाळी ७.३०च्या सुमारास नशिराबाद येथे घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात बुधवारी २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव शिल्पा उमाकांत खाचणे असे आहे.
सविस्तर माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथे शिपलं उमाकांत खाचणे या आपल्या पतीसह जळगाव एमआयडीसी मध्ये कामाला आहे. दरम्यान त्यांच्या मोबाईलची बॅटरी खराब झाल्यामुळे दोघेजण १९ डिसेंबर रोजी संध्याकाळी नशिराबाद येथे आले होते. मोबाईल दुरुस्त करून पुन्हा बेलव्हाय येथे जाण्यासाठी ७.३० वाजता दुचाकीने निघाले. सिमेंटचा रास्ता असल्या कारणाने आलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटला आणि महिला जमिनीवर कोसळली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पापणी करत त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात शोकाकुल वाटेवर आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.