महाक्रिटीकॉन कॉन्फरन्सच्या पूर्वनियोजनासाठीची मीटिंग संपन्न…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील IMA सभागृहात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महाक्रिटीकॉन क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट महाराष्ट्र स्टेट यांच्या जळगाव मधील पहिल्या कॉन्फरन्सच्या पूर्वनियोजनासाठीची मीटिंग आज घेण्यात आली. ही कॉन्फरन्स 18-20 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. तसेच या कॉन्फरन्स साठी महाराष्ट्रातील नामांकित क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट येणार आहेत. सदर कार्यक्रमाच्या पुर्वनियोजनाच्या तयारीसाठी मा.खा. डॉ.उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कॉन्फरन्सचे चेअरमन डॉ.राहुल महाजन, डॉ.राजेश डाबी, सेक्रेटरी डॉ.रवींद्र पाटील, डॉ.लीना पाटील, डॉ.कल्पेश गांधी, डॉ.धीरज चौधरी, डॉ.दीपक पाटील, डॉ.प्रियंका पाटील, डॉ.अमित हिरवरकर, डॉ.दिपाली साठे, डॉ.सुनील सूर्यवंशी त्याचबरोबर जळगावातील अनेक नामांकित डॉक्टरांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.