दै. लोकशाहीच्या वर्धापन दिनी संभाजीराजे छत्रपती जळगावात

0

 

लोकशाही वर्धापनदिन विशेष

 

दैनिक लोकशाहीचा ६९ वा वर्धापन दिनानिमित्त येत्या २८ मे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता शिवकुल संवाद आयोजित करण्यात आला आहे.

लोकशाही माध्यम समूहाच्या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वंशज ‘ संभाजी राजे छत्रपती’ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

दरम्यान या विशेष दिनाचे औचित्य साधून संभाजीराजे छत्रपती यांच्याशी ’शिवकुल संवाद’ या विशेष प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून  जळगावकरांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे.

सदर कार्यक्रम हा रविवार २८ मे रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगाव येथे सायंकाळी ०६:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी शहरातील तथा जिल्ह्यातील नागरिकांनी व लोकशाही समूहावर प्रेम करणाऱ्या अबाल वृद्धांनी या ‘शिवकुल संवाद’ आणि ‘दै. लोकशाही वर्धापन दिन’ या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकशाही समूहातर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशी बैठक व्यवस्था असल्याने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन लोकशाही समूहातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.