जो समयज्ञ तोच सर्वज्ञ- डॉ. पद्मचंद्र म. सा.

0

प्रवचन सारांश – 06.11.2022 

जी व्यक्ती वेळेचे महत्त्व जाणते ती व्यक्ती सर्वज्ञ ठरते असे महत्त्वाचे बोल डॉ. पदमचंद्र जी म.सा. त्यांनी आजच्या प्रवचनात सांगितले. जळगाव येथील स्वाध्याय भवनात मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित होते.

कालचक्र फार क्रूर आहे. जोवर मनुष्य जन्म मिळाला तोवर सत्कार्य करत रहावे. आशुज्ञान आणि पंडीत या शब्दांचा नेमका अर्थ समजावून सांगितला. कोणतेही कार्य करण्याआधी विचार करा. हा विचार दोन्हीही बाजूने व्हावा. त्याचे चिंतन करावे. कार्य केले तर त्याचा परिणाम व दुष्परिणाम होणारच. ‘सोच किया सो जो शूर  है, कर सोचे सो क्रूर!’  जो विचार करून कार्य करतो तो शूर व कृती करून  विचार करत असतो क्रूर असतो.

जीवनात एक फॉर्म्युला नक्की लक्षात ठेवा. कोणती ही कृती, कार्य करायचे असेल तर आधी दोन वेळा नक्की विचार करावा असे मोलाचे वचन डॉ. पदमचंद्रजी म.सा. यांचे सुशिष्य पु. जयपुरंदर म. सा. यांनी ‘मेरी भावना’ प्रवचन मालेत सांगितले.

जळगाव येथील आर. सी. बाफना स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पूज्य. पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरु आहे. या चातुर्मास समाप्तीचा टप्पा सुरू आहे. आपल्या प्रवचनात पूज्य  जयपुरंदर म. सा. यांनी ‘मेरी भावना’च्या पुढील ओळींचे  स्पष्टीकरण केले. मोठ्या बंगल्याच्या बाहेर गेरवर तुम्हाला ‘कुत्र्या पासून सावधान’ ही पाटी वाचायला मिळते. आपण जीवन जगत असताना एक गोष्ट मनात कायम ध्यानात ठेवा ते म्हणजे ‘पापा पासून सावधान!’ असे ध्यानात ठेवले तर आपल्या हातून पाप होणार नाही. जीवनात सत्कार्य करत रहावे असे आवाहन प्रवचनातून केले.

जो समयज्ञ असतो तो सर्वज्ञ बनतो. कालपुरुष असतो ना तो कुणालाच सोडत नाही. डॉक्टर आणि वैद्य यांची संख्या भरपूर आहे तरी देखील मृत्यू होतात. किती चातुर्मास आले आणि गेले. आपण काय शिकलो, काय मिळविले! ह्या बाबीवर चिंतन अवश्य करावे. 80 टक्के मुले हे स्वतःची आवड, जीवनाचे नेमके उदिष्ट काय आहे? हे न विचारात घेता घरचे अमुक करा सांगतात म्हणून मुलं कोर्सला प्रवेश घेतात एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या संस्थांमध्ये मुलांना शिकवा, आपल्याच समाजातील गरिबाला त्यासाठी मदत करा. गुणवत्ता वाढवा असे आवाहन अनुपेहा ध्यान प्रणेते पूज्य पदमचंद्र म.सा. यांनी प्रवचनातून केले.

आता पर्यंत जीनशासन वर अनेक संकटे आले त्या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यात आली. मनुची, विष्णुकुमार मुनी यांचे उदाहरण त्यांनी दिले. अत्यंत अभ्यासू व प्रभावशाली प्रवचन डॉ. पदमचंद्र म.सा. यांनी केले.

——□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.