RBI ची मोठी घोषणा; आता UPI अॅपद्वारे मिळणार कर्ज

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अनेक जण बँकेतून कर्ज काढत असतात, मात्र त्यासाठी बँकेत खूप फेऱ्या माराव्या लागतात. पण आता तुम्हाला बँकेत चकरा मारायची गरज नाही कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी घोषणा केली आहे. आता  UPI अॅपद्वारे मिळणार आहे. यासाठी RBIने बँकांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. RBI ने देशातील सर्व बँकांना युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI वर ग्राहकांना प्री-अप्रुव्हड कर्ज देण्यास सांगितले आहे.

व्याप्ती वाढेल 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या निवेदनानुसार, सध्या बचत खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, प्रीपेड वॉलेट आणि क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले जाऊ शकते. आता त्याची व्याप्ती आणखी वाढवली जात आहे. यूपीआयद्वारे आता क्रेडिट लाइन्सला फंडिंग अकाउंटच्या रुपात सामील करुन याची व्याप्ती वाढवली जात आहे. RBI ने म्हटले की, या सुविधेअंतर्गत UPI प्रणाली वापरुन प्री-अप्रुव्हड कर्ज मिळेल.

बोर्डाची मान्यता घ्यावी लागेल

ही प्रक्रिया राबवण्यापूर्वी सर्व बँकांना धोरण तयार करून त्यांच्या संचालक मंडळाकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. या पॉलिसी अंतर्गत किती कर्ज दिले जाऊ शकते? ते कोणाला देता येईल? कर्जाचा कालावधी काय असेल? तसेच कर्जावर किती व्याज आकारले जाईल? या सर्व गोष्टींवर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. 6 एप्रिल रोजी केंद्रीय बँकेने आपल्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीत बँकांकडून पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन हस्तांतरित करुन पेमेंट करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडला होता. UPI ची व्याप्ती वाढवणे हा त्याचा उद्देश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.