क्षणार्धात निर्जीव पुतळ्यांप्रमाणे जमीनदोस्त…(व्हिडीओ)

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;  

मृत्यू हे एकमात्र शाश्वत आहे या जगात. पण तो कधी, कुठे आणि कसा येईल हे मात्र कुणालाच ठाऊक नाही. अश्याच एक घटनेत काही लोक हे उभ्यानेच मृतुच्या दाढेत गेल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

जोरदार पाऊस असल्या कारणाने काही लोक झाडाच्या खाली येऊन उभे राहतात. मात्र त्यांना काय ठाऊक कि, तिथ त्यांचा काळ त्यांची वाट पाहत आहे. ते तेथे उभे राहतात आणि क्षणार्धात निर्जीव पुतळ्यांप्रमाणे जमीनदोस्त होतात. आपणही व्हिडीओ मध्ये पाहू शकत आहात. कश्याप्रकारे ते उभे असलेल्या झाडावर वीज कोसळते आणि त्यांचा मृत्यू होतो ते.

पावसात झाडाखाली कधीच उभं राहू नये असं सांगितलं जातं. तरी लोक झाडाखाली उभे राहतात. त्याचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो ते तुम्ही या व्हिडीओत पाहिलात. त्यामुळे आता पाऊस पडल्यावर त्यात भिजणं पत्करा पण झाडाखाली चुकूनही उभं राहू नका.

@TansuYegen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स घाबरले आहेत. हे भयानक दृश्य असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. झाडाखाली आश्रय घेणाऱ्यांना वीज पडण्याचा धोका जास्त असतो. या घटनेला ‘साइड फ्लॅश’ म्हणतात. असे तेव्हा घडते जेव्हा वीज व्यक्तीच्या जवळ असलेल्या लांबलचक वस्तूवर पडते आणि विद्युत प्रवाहाचा एक भाग त्या लांब वस्तूद्वारे पीडितपर्यंत पोहोचते. भारतातील मृत्यूंपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे झाडाखाली किंवा जवळ उभ्या असलेल्या लोकांचे झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.