LG चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल १० हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

0

LG Wing स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत तब्बल १० हजार रुपयांची कपात केली आहे. या फोनला वर्षभरापूर्वी लाँच करण्यात आले होते. आता हा फोन स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो.

 

या फोनची किंमत कपात करण्यात आल्यानंतर अॅमेझॉनवर या फोनची किंमत आता ५९ हजार ९९० रुपये झाली आहे. या फोनला गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये लाँच करण्यात आले होते. लाँच करताना या फोनची किंमत ६९ हजार ९९० रुपये होती. किंमत कमी झाल्यानंतर या फोनला कंपनीच्या वेबसाइटवरुन सुद्धा खरेदी करता येऊ शकते.

 

फोनचे फीचर्स

ड्यूल स्क्रीनच्या या फोनमध्ये 1080×2440 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याशिवाय फोनमध्ये ३.९ इंचाचा एक सेकंडरी डिस्प्ले दिला आहे. जो 1080×1240 पिक्सल रेजॉलूशन सोबत येतो. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मेमरीच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 765G चिपसेट दिला आहे.

 

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलजी विंग मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. यात एलईडी फ्लॅश सोबत ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड गिंबल मोड कॅमेरा याचा समावेश आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे. बॅटरी फास्ट चार्जिंग साठी यात क्विक चार्ज ४.० फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी दिली आहे. ओएस मध्ये हा फोन अँड्रॉयड १० ओएस वर बेस्ड कंपनीच्या कस्टमाइज्ड यूआय सोबत येते.

Leave A Reply

Your email address will not be published.