आकाशवाणी चौकातून वृद्धेची सोनसाखळी लांबविली !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
६० वर्षीय वृद्ध महिलेच्या जवळील २६ ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथे घडली आहे. याबाबत १९ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , आशाबाई रविंद्र पाटील (वय-६०, रा. कुंभारखेडा ता.जि.जळगाव) या वयोवृद्ध महिला बुधवार १८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता आपल्या वैयक्तिक कामासाठी आकाशवाणी चौक येथे आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळ असलेली सोन्याची २६ ग्रॅम वजनाची चैन हातचालाखिने त्यांच्या जवळून चोरून नेली. हा प्रकार वृद्ध महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोन्याची चैनचा सर्वत्र शोध घेतला. त्यांना सोन्याची चैनबद्दल काहीही माहिती न मिळाल्याने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी वंदना राठोड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.