ड्रग्ज तस्कर ललित पाटीलसह १४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

0

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात ड्रग्जतस्कर ललित पाटील याच्यासह १४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र तब्बल तीन हजार १५० पानांचे आहे. या आरोपपत्रातून महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत.

अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे (सध्या रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), अमित जानकी सहा ऊर्फ सुभाष जानकी मंडल (२९, सध्या रा. पुणे), रौफ रहीम शेख (१९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे रेल्वे स्थानक परिसर), भूषण अनिल पाटील (३४), अभिषेक विलास बलकवडे (३६), प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित मोहिरे (३९), झिशान इक्बाल यांच्याविरुद्ध पुणे शाखेने विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात ड्रग्जतस्कर ललित पाटील याच्यासह १४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र तब्बल तीन हजार १५० पानांचे आहे. या आरोपपत्रातून महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत.

अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे (सध्या रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), अमित जानकी सहा ऊर्फ सुभाष जानकी मंडल (२९, सध्या रा. पुणे), रौफ रहीम शेख (१९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे रेल्वे स्थानक परिसर), भूषण अनिल पाटील (३४), अभिषेक विलास बलकवडे (३६), प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित मोहिरे (३९), झिशान इक्बाल(४०, सर्व रा. नाशिक), रेहान ऊर्फ गोल आलम सुलतान मोहम्मद अन्सारी (२६, सध्या रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), राहुल पंडित ऊर्फ रोहित कुमार चौधरी ऊर्फ अमित कुमार (३०, सध्या रा. विरार, मूळ रा. बिहार), समाधान बाबूराव कांबळे (३२, रा. मंठा, जि. जालना), इम्रान शेख ऊर्ड अमीर आतिक खान (३०, रा. धारावी, मुंबईरा. वसई, पालघर) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. विजय फरगडे सरकार पक्षाकडून काम पाहत आहेत. चाकण परिसरात मेफेड्रॉन विक्री प्रकरणात ललित पाटीलला अटक केली होती. ससून रुग्णालयातून त्याने साथीदारांच्या मदतीने ड्रग्ज विक्री सुरू केली होती.

पुणे पोलिसांना तपासात ड्रग्ज तस्करी, विक्रीची माहिती मिळाली. ललित आणि साथीदारांनी नाशिक परिसरातील शिंदे गावात बंद पडलेल्या कारखान्यात ड्रग्जनर्मिती सुरू केली होती. अमली पदार्थ तस्करी, विक्रीचे जाळे त्याने साथीदारांच्या मदतीने निर्माण केले होते. तो बड्या तस्कराच्या संपर्कात होते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. ललित पाटीलने साथीदारांच्या मदतीने तस्करी केली. याप्रकरणी ललितसह साथीदारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. पोलिसांनी आरोपपत्रात १०० हून जास्त साक्षीदारांची यादी जोडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.