संत श्रीपाद बाबा पुण्यतिथी सोहळा निमित्त कीर्तन

0

भडगाव |  प्रतिनिधी

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे देवाने आपल्याला मानवी नरदेह दिलेला आहे तर आपण काय करावे काय नाही करावे आपल्याला भगवंताने मुख दिलेल आहे तर विठ्ठल बोलण्यासाठी, आपल्याला डोळे दिलेले आहेत देवाने तर विठ्ठल आत्मचिंतनासाठी, जीव भावाने विठ्ठल करण्यासाठी ज्या वेळेला आपलं मन रमत मग त्यावेळी येणेसोसे मन झाले हावभरी. त्यांच्या रसाळ वाणीतून महाराजांनी ज्ञानाचा बाळकडू समाजाला पाजले. ह.भ.प. युवाकिर्तनकार कुंदनजी महाराज पवार भडगांव जि. जळगांव  संत सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा घोटी ता. इगतपुरी जि.नाशिक येथे पुण्यतिथी सोहळा निमित्ताने या वर्षी  रौप्य महोत्सव मध्ये कीर्तन संपन्न झाले.

 ह.भ.प. युवाकिर्तनकार कुंदनजीमहाराजांचा परिचय
वयाच्या सात वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांसोबत त्यांचे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण घोटी कर या महात्मा यांच्या पुण्यतिथी ला गेले होते. त्या ठिकाणी साधकांना जे भाव प्रगट झाले ते भाव बघून  त्यांच्या वडिलांना सांगितलं की हे जे यांना होते असं मला पण व्हायला पाहिजे त्या वेळेला त्यांचे वडीलानी त्यांना सांगितलं म्हणून याच्यासाठी तुला सद्गुरूंचा अनुग्रह घ्यावा लागेल त्यावेळेला महाराजांनी त्या ठिकाणी अनुग्रह घेतला आणि तिथून एक वर्षानंतर म्हणजे वयाच्या आठ वर्षाच्या असताना महाराजांनी पहिले कीर्तन केले बाल कीर्तनकार म्हणून सुरुवात केली होती आता युवा कीर्तनकार झालेत आणि सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने ज्या ठिकाणी महाराजांनी अनुग्रह घेतला त्याच ठिकाणी सद्गुरूंच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने यावर्षी सद्गुरूंच्या कृपा छत्राखाली त्या ठिकाणी कीर्तनाचा योग घडून आला.

घरात पहिल्यापासून आजोबा आजी वडील आई वारकरीच म्हणजे असा वारसा चालत आलेला आहे वडिलाचे स्वप्न होते की मुलगा किर्तनकार झाला पाहिजे आणि महाराजांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

मुळी बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी
सद्गुरू वाचूनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी
-ह.भ.प कुंदन समाधान पवार,महाराज,भडगावकर

Leave A Reply

Your email address will not be published.