लिनेस क्लबच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

खामगाव ; लिनेस क्लब खामगावच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत 8 मार्च रोजी कुटुंबाला आधार देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून खऱ्या अर्थाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

अध्यक्षस्थानी लिनेस क्लबच्या अध्यक्षा हरप्रितकौर बग्गा, प्रमुख वक्ता ॲड. मेघा देशमुख तर लिनेस क्लबच्या वरिष्ठ अधिकारी निर्मला जैन, डॉ. अपर्णा बावस्कार, सचिव सोनल बुद्धदेव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ॲड. मेघा देशमुख यांनी महिलांवर कौटुंबिक व इतरांकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत खंत व्यक्त करीत महिलांच्या संरक्षणार्थ असलेली कायदेविषयक माहिती दिली.

सोबतच भविष्यात महिलांवरील अत्याचाराला आळा घालायचा असेल तर प्रत्येक घरातील महिला व मुलींना सुशिक्षित करण्यासाठी कुटुंब प्रमुख व पालकांनी खबरदारी घ्यावी असे भावनिक आवाहनही ॲड. मेघा देशमुख यांनी केले. यानंतर स्वकमाई करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुलोचना सुरंगे, संगीता बहुरूपिया, लिला रेतकर, सोनाली, वर्षा राऊत, विजया शर्मा, सुनीता परदेशी आदींचा समावेश आहे.

सोबतच या सर्व महिलांना आरोग्यदायी तुळशीच्या रोपट्यासह जीवनावश्‍यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला लिनेस क्लब सदस्या सरबजीत कौर सलुजा, डॉ. रश्‍मी कविश्‍वर, अंजु झिणेे, लता सलुजा, सपना मुनोत, अश्‍विनी शर्मा, ज्योती खोरीया, रितु बडजाते, स्मिता देशमुख, निकिता शहा, पुजा कापरे, निला अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, अशी माहिती लिनेस क्लबच्या जनसंपर्क अधिकारी सौ. मनिषा जैन यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.