खामखेड रेल्वे ट्रॅकवर अज्ञात युवकाचा आढळला मृतदेह

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

तालुक्यातील खामखेड (Khamkhed) गावाच्या रेल्वे ट्रॅक वर २७ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला असून मृतकाची ओळख पटवण्याचे ग्रामीण पोलिसांनी आवाहन केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घटना माहिती देणार स्टेशन मास्तर आरती शेकोकार, उपस्टेशन अधिकारी किशोर आनंदा वराडे, ट्रेकमन युनिट नं ८ मलकापूर रेल्वे खामखेड येथे दि.15 एप्रिल 23 रोजी 11 वाजता अज्ञात व्यक्तीचे मृतदेह दिसताच ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.पोलीसांनी पंचनामा करून मृतकाचे वर्णन उंची अंदाजे पाच फूट, रंग मध्यम गोरा, अंगावर पांढरे रंगाचे त्यावर कथीया रंगाचे लाइनिंग असलेले फुल बाह्यांचे शर्ट ,निळ्या रंगाची बनियान व निळ्या रंगाचा हाफ बरमोडा, कपाळावर थोडे टक्कल पडलेले काही प्रमाणात दाढी व मिशी असलेले मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करीत आहे पुढील तपास पो. उ. नी कुणाल जाधव करीत आहे. सदर मृतदेहाची ओळख पटल्यास मलकापुर ग्रामीण पोलीस स्टेशनशी 8999320836,9922274709 संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.