केदारनाथ यात्रा थांबवली; गौरीकुंड दरड कोसळून १९ जण बेपत्ता…

0

 

उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

उत्तराखंडमधील गौरीकुंडमध्ये भूस्खलनामुळे १९ जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच केदारनाथ यात्राही थांबवण्यात आली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास केदारनाथच्या मुख्य थांबा गौरीकुंड दात पुलियाजवळ दरड कोसळल्याने टेकडीवरून 3 ते 4 दुकानांवर ढिगारा आल्याने 19 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुसरीकडे, नवीन अपडेट देताना, आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले की, लोकांनी दिलेल्या माहितीमध्ये बेपत्ता लोकांची संख्या 13 वरून 19 वर पोहोचली आहे. जी दुकाने आणि हॉटेल्स पडली आहेत. त्यांचा मलबा थेट नदीत पडलेला दिसतो. यावरून असे अनुमान काढले जाऊ शकते की अधिक लोक एकतर गाडले गेले आहेत किंवा नदीत वाहून गेले आहेत.

दरम्यान किती लोकांची सुटका करण्यात आली याची माहिती प्रशासनाने अद्याप दिलेली नाही. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बचाव पथकाला सावध राहून बचावकार्य करण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तोच केदारनाथ यात्रेचा मार्ग असून केदारनाथला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येत आहे. डोंगरावरील ढिगारा रस्त्यावरून हटवला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.