विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराचा विचार करून अध्यापन करा – प्रा. रेखा भोळे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

केसीई सोसायटी संचलित शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक रेखा भोळे यांनी विद्यार्थ्यांना वाचन, चिकाटी,परिश्रम यामुळे यश प्राप्त होते, शाळेत गेल्यावर निष्ठेने अध्यापन करा व विद्यार्थ्यांच्या स्तरावर जाऊन अध्यापन करा असा मौलिक संदेश दिला.

यावेळी बक्षिस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे प्रा. रेखा भोळे उपप्राचार्य धनाजी नाना विद्या प्रबोधिनी व कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. टी.पाटील कोषाध्यक्ष केसीई सोसायटी, संयोजक प्रा. कुंदा बाविस्कर यावेळी मंचावर प्राचार्य ए.आर. राणे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, प्रा. निलेश जोशी, प्रा. रंजना सोनवणे, प्राध्यापक साधना झोपे प्राध्यापक प्रवीण कोल्हे उपस्थित होते.

बी.एड, एम एड. एम पी एड 2021 च्या विद्यापीठ परीक्षेत महाविद्यालयात व विद्यापीठात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुक्त विद्यापीठ बी एड एम एड शिक्षण शास्त्र डीएसएम व बाल संगोपन या शिक्षणक्रमात महाविद्यालयात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला.

महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांची विद्यापीठ खेळाडू व खेलो इंडिया या योजनेत निवड झाल्याबद्दल क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापकांना विविध क्षेत्रात संपादन केलेल्या प्राविण्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. डी.एड विभागातील प्राध्यापक व शिक्षकांचा यावेळी गौरव केला.

Leave A Reply

Your email address will not be published.