केसीई कॉलेजमध्ये शेखर देवभानकर यांचे “इंग्लिश ईज इजी” या विषयावर सेमिनार

0

जळगाव ;– केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट विभागातील – ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी शेखर देवभानकर सर यांचे “इंग्लिश ईज इजी” या विषयावर सेमिनार आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेखर देवभानकर सर यांचा प्रिंसिपल डॉ. संजय सुगंधी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या सेमिनार मध्ये शेखर देवभानकर सर यांनी लर्निंग, स्पिकिंग, रिडींग आणि राइटिंग या ४ क्रियांमध्ये लर्निंगवर विशेष भर दिला ज्या प्रमाणे लहान मूल जन्माला आल्या नंतर २ वर्षानंतर बोलायला शिकते, ज्या वयात मूल कुठल्याही प्रकारचे लिहायला किंवा वाचायला शिकलेले नसते तरीही बरोबर बोलायला शिकते, आणि हे शक्य होते ते केवळ ऐकण्यामुळे म्हणजेच लर्निंग प्रोसेसमुळे. या सूत्राचा आपण अंगीकार केला तर इंग्रजी भाषा शिकायला सोपी होईल. यानंतर देवभानकार सरांनी फॉर स्केअरचा गेम घेतला विद्यार्थ्यांना प्रत्येक चौकोनात वेगवेगळ्या संख्येचे एक सारखे ३, ४, ७ चौकोन काढण्याची टेकनिक सुद्धा शिकविली, यामुळे विद्यार्थ्यांना विचार करण्याची क्षमता विकसित करण्यास मदत झाली.

प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी भाषा शिकून दर्जेदार जॉब मिळविण्यासाठी दिवसातून इंग्रजी भाषेसाठी किती वेळ द्यायला पाहिजे याचेही तंत्र विद्यार्थ्यांना शिकविले. शेवटी त्यांनीही एक खंत व्यक्त केली की इंजिनीरिंगच्या ९७ टक्के विद्यार्थ्यांना अस्खलित इंग्रजी बोलता येत नाही, त्यामुळे असे विद्यार्थी चांगला जॉब मिळवू शकत नाही.

या कार्यक्रमात ४३ विद्यार्थी उपस्थित होते, सूत्र संचालन प्रा.निकिता बालानी, आभार प्रदर्शन प्रा. मयूर बोरसे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजय सुगंधी-प्रिंसिपल, प्रा.रवींद्र स्वामी – विभाग प्रमुख, एमबीए ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट यांनी प्रयत्न केले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.