जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील शिवाजीनगरमधील मन पार्कमध्ये राहणार नदीम अहमद शेख सलीम (वय ३०) हा तरुण शनिवारी (दि. २५) रात्री घरी जात असताना त्याला जुन्या भांडणाने कारण उकरून काढत चौघांनी लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीत नदिमध्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
उपचारानंतर त्याच्या फिर्यादीनुसार शहर पोलिस ठाण्यात शेख रईस शेख रशीद, आलम शेख रशीद, हमु शेख रशीद आणि शेख रशीद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक संजय झाल्टे हे तपास करत आहेत.