नैराश्येतून महिलेची गळफास घेत आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील कंडारी येथील ४३ वर्षीय महिलेने नैराश्येतून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रमिला कैलास परदेशी (वय ४३, रा. कंडारी ता. जि.जळगाव) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. प्रमिला परदेशी ह्या पती व मुलासह वास्तव्याला होते. शिवणकाम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होत्या. रविवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री घरात कुणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केली.

सदर प्रकार रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. आपण नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद कले आहे.

या घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.