मोबाईल लंपास करणाऱ्या तिघांना अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कंडारी येथे जेवण झाल्यानंतर शतपावली करीत असलेल्या एकाच्या हातातून महागडा मोबाईल लंपास करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी भुसावळ शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कंडारी येथील पीओएच कॉलनीत जेवण झाल्यानंतर शतपावली करीत असलेल्या विलास विश्वनाथ सोनार यांच्या हातातून आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी धूम स्टाईल लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तब्बल दोन वर्षानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी निकेश मधुकर वानखेडे (वय २३, रा. कंडारी, भुसावळ), सचिन मनोज जाधव, (वय १९, रा. पाळधी, ता. जामनेर) आणि चोरीचा मोबाईल घेणारा सिध्दांत अरुण म्हस्के (वय २५, रा. पीओएच कॉलनी, कंडारी, भुसावळ) या तिघांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी भुसावळ शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, एएसआय अशोक महाजन, हवालदार सुनील दामोदरे, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल विनोद पाटील, चालक कॉन्स्टेबल मुरलीधर बारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.