तरूणीचा मोबाईल लांबविला; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील मेहरूण भागातील बंगाली गल्लीतून तरूणीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेघना चैत्राम पाटील (वय २१, रामेश्वर कॉलनी) येथे कुटुं‍बियांसह वास्तव्याला आहे. रविवारी सकाळी मेघना पाटील कामानिमित्त मेहरूण येथील महाजन नगरातील बंगाली गल्लीत गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांचा १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरल्याची घटना समोर आलीय. त्यांनी परिसरात मोबाईलचा शोध घेतला. परंतू कुठेही मोबाईल आढळून आला नाही.

दरम्यान मेघना पाटील यांनी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील हे करीत आहेत .

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.