कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर सट्टा पत्ता खेळणाऱ्या ११ जुगाऱ्यांना अटक

0

जळगाव;- कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर सट्टा पत्ता खेळणाऱ्या ११ जुगाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून २ हजार रुपयांच्या २ फायटर कोंबड्यांसह ५ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार भुसावळ तालुक्यात कुऱ्हा या गावी एका शेताच्या बाजूला सार्वजनिक जागी झुडपाजवळ १५ ते १६ इसम हे कोंबड्यांच्या झुंज लावून त्यावर पैशांचा हार-जीतचा खेळ खेळताना दिसून आले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये २ हजार रुपये किमतीचे फायटर कोंबडे, ३ हजार ६०० रुपये रोख, मोबाईल फोन आणि १४ दुचाकी असे मिळून ५ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी शहीद शेख सादिक (वय २३), शेख जावेद शेख (वय ३८), आशिष राजेश सोनी (वय २१), नेल्सन लेनिन पेट्रो (वय ४३), शेख आरिफ शेख युसुफ (वय ३१), मोहसीन शेख (वय ३२), सलमान शेख सलीम (वय २६), रशीद सय्यद निसार (वय ४२), अर्जुन बादल गरड (वय २४), शेख इमाम शेख (वय ३८) आणि इतर पाच ते सहा जण यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बबन जगताप, सपोनी विशाल पाटील, विठ्ठल फुसे, पोहेकॉ सुरज पाटील, संकेत झांबरे आदींनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.