पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत यांची समयसूचकता; हरवलेले हिरालाल बाविस्कर पोस्टमन सापडले

0

ज्ञानेश्वर राजपूत, लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पोस्ट खात्यात पोस्टमन पदावर प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्यानंतर पोस्टमन यांना मानसिक व्याधीने ग्रासले एकेकाळी घरभर शोधून पोस्ट पत्रांच्या माध्यमातून सुखदुःखाची बातमी पोहोचवणारे त्यांनाच मानसिक व्याधीने ग्रासले म्हणजेच आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाला काय आजार-तिजार लागेल याची शाश्वती नाही मन अस्वस्थतेने त्यांच्यावर उपचार सुरू असताना ते हरवले होते. या चक्रव्यूहात फिरत असताना जवळपास पावणे दोन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर कुटुंबीयांना ते प्राप्त झाल्याने आनंद गगनात मावेनासा झालेला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिरालाल बाविस्कर हे पोस्टमन पदावर कार्यान्वित होते. प्रदीर्घ सेवेनंतर ते निवृत्त झाले निवृत्तीनंतर त्यांना अल्पशा मानसिक व्याधीने ग्रासले कुटुंबियांकडून त्यांच्यावर मोठा मुलगा संजय बाविस्कर (सनी टेलर) कामानिमित्त राहत असलेल्या नवी मुंबईतील रोडपाली कळंबोली येथे उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना त्यांच्या चक्रव्यूहात दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी हरवले. कुटुंबीयांनी परिसरात बरीच शोधाशोध करून ते त्यांना मिळून आले नाहीत. अखेर त्यांनी कलंबोली पोलीस ठाणे नवी मुंबई येथे हरवल्याची रीतसर नोंद केली. तरीही मित्रपरिवार व नातेवाईक यांच्यामार्फत शोधाशोध सुरू होती.

कुटुंबियातील पितामह सापडण्यासाठी अनेक ठिकाणी पोस्टर लावून प्रयत्न सुरू होते म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर! एक दिवस नक्कीच आशेचा किरण उगवतो. तसेच या प्रकाराबाबत झाले लोहारा येथील दैनिक लोकशाहीचे पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत यांना दिनांक ११ फेब्रुवारी शुक्रवार रोजी रात्री उशिरा सदर व्यक्ती संकटात आहे. ती रायगड पोलीस स्टेशनला असल्याबाबतचा व्हाट्सअप मेसेज प्राप्त झाला पण त्या मेसेजमध्ये रायगड पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्ह्याचे ठिकाण असल्याने आठ ते दहा पोलीस स्टेशन असावीत कोण कोणाशी संपर्क साधावा असे ठामपणे सांगितले नव्हते.

सहाजिकच विचार केला तर कोणताही व्यक्ती अशा अवस्थेत काही दिवस बाहेर कुठल्याही प्रकारचे संरक्षण नसताना त्याची काय अवस्था असते हे आपण डोळ्याने बघतो अशीच अवस्था त्यांची झालेली त्यात त्यांच्या कुटुंबीयांनाही हा मॅसेज प्राप्त झाला असावा. सदर कुटुंबीयांना ही व्यक्ती सुपूर्द करण्यात आली असावी तेव्हा कोणत्यातरी नातेवाईकाने किंवा मित्रमंडळीने हा मेसेज वायरल केला असावा असे गृहीत धरून रात्री त्यांच्या घरापर्यंत हा मेसेज पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत यांनी दाखविला नाही.

तर आजची तरुणाई कोणतेही मेसेजची खातरजमा न करता व्हायरल करण्यात आनंद मानते या प्रचार प्रसारात अशा प्रकारातून गोत्यात येतात. परंतु पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत यांनी ती पोस्ट पुढे वायरल केली नाही. नियतीचे काही जुळत असावे पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत बसस्थानक आवारातून बैलगाडीने त्यांची गुरं घेऊन जात असताना पोस्टमन यांचे लहान चिरंजीव विजय बाविस्कर समोरून आले व कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असल्याने आस्थेवाईकपणे पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत यांनी यांचे चिरंजीव यांना समाजाचे नसले म्हणून काय झाले पण कौटुंबिक संबंध असल्याने मामा सापडले? असे विचारले असता नातेसंबंधाच्या विचार करतात दोघांमध्ये दोन चार मिनीटे हास्याचा शाब्दिक फुलोरा रंगला हे बाजूला सारून अगोदरच मानसिक टेन्शनमध्ये असलेल्या पोस्टमन पुत्र यांना ही व्हाट्सअप मेसेज द्वारे प्राप्त झालेली पोस्ट दाखवली.

त्यांना ही थोडे हायसे वाटले व मोठे भाऊ यांना ही पोस्ट पाठवण्याची विनंती केली त्यानंतर सदर यांनी काही अवधीतच हरवल्याची नोंद केलेले कळंबोली पोलीस ठाणे गाठले व सदर पोस्टबाबत कल्पना संबंधित हेडकॉन्स्टेबल वाघमोडे दाखविली त्यांनीही पाहून घेत पुन्हा ऐकून घेतली व्हाट्सअप पोस्ट कुठून आली. कशाप्रकारे आली याबाबत पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत यांच्याशी वार्तालाप करून त्यांची सायबर यंत्रणा अवलंबली तर पहिल्यांदा कुठून ही पोस्ट व्हायरल झाली त्यांचा भ्रमणध्वनी शोधला असता तो पेण येथील पोलीस कर्मचारी यांचा होता त्यांनी सदर प्रकार डिपार्टमेंटमधील संपर्कातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सांगितला तर काल सायंकाळी त्यांना मी चहापाणी देऊन मी बाहेरून येतो असे सांगितले पण ते इथून निघून गेले.

त्यामुळे कुटुंबीयांना व पोलीस प्रशासनाला पुन्हा शोधमोहीम राबवण्याची वेळ आली पण या रुपी एक आशेचा किरण मात्र मिळालेला होता. बाविस्कर कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी यांनी शोध मोहीम राबवली त्यांना ते पेण जिल्हा रायगड येथे आपल्या चक्रव्यूहात भटकत असल्याचे दिनांक १४ फेब्रुवारी सोमवार रोजी तब्बल पावणे दोन महिन्यांनी मिळून आले. याकामी आंबेगावचे पोलीस पाटील इंद्रजीत ठाकूर, साई समर्थ हॉटेलचे मालक उमेश ठाकुर, यशवंत पवार, कलंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सतिष वाघमोडे, मुंबई पोलीस दलात असलेले दीपक मोरे यांचे सहकार्य लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.