तळेगाव येथे सर्पमित्राने दिले नागाला जीवदान

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर तालुक्यातील तळेगावात आप्पा कडुबा वंजारी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेड मधे अतिविषारी असा नाग जातीचा साप हा शेतकर्‍यांना दिसला . त्यानी क्षणाचाही विलंब न करता गावातीलच सर्प मित्र अरुण कोळी यालात्वरित बोलावून घेतले. सर्पमित्र आपल्या काही मित्रांसह शेतात पोहचला.

त्यांनी लगेच त्या विषारी सर्पास बघताच हा प्रक्टिकल कोब्रा जातीचा सर्प असुन शेतकऱ्यांनी साप दिसताच त्यास न मारता जंगलात सोडुन द्यावे. तसेच साप हा शेतकऱ्यांचा मित्र असुन उपद्रवी घुशी उंदीर या सारख्या जनावरांपासून शेतकऱ्यांच्या धान्य व पिके यांचे रक्षण करतात. अशी माहिती उपस्थित नागरीकांना व शेतकऱ्यांना दिली.

 

सर्पमित्र अरुण कोळी त्याच्या मित्रांनी एका प्लॅस्टिक बरणी मध्ये नागाला जिवंत पकडुन जेरबंद केले व त्याला वन संवर्धन भागात सोडून दिले. सर्प मित्र अरुण कोळी याने आता पर्यत २०० च्या वर सर्पांना जीवदान दिले आहे. त्यामुळे शेतकरी आप्पा वंजारी यांच्या सह मजूरांनी सुटकेचा निश्वास घेतला. सर्प मित्र अरुण कोळी याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यात मित्र सहकार्य म्हणून अनिल शिंदे, कृष्णा माळी गोलू कोळी ,अरुण कोळी (वाघ ) आकाश कोळी , वैभव घोरपड़े, नागेश कोळी आदींचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.