Jio चा भन्नाट प्लान; वर्षभराची व्हॅलिडिटी, भरपूर ऑफर्स

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

इंटरनेटप्रेमींसाठी Jio ने भन्नाट प्लान दिलाय. या ऑफरमध्ये यूजर्सना 75GB अतिरिक्त डेटासह अन्य ऑफर्सचाही लाभ घेता येणार आहे.

Jio च्या या ऑफरसाठी ग्राहकांना केवळ एक रिचार्ज करायचे आहे. रिचार्ज केल्यानंतर युजर्सला एक वर्षाची व्हॅलिडिटी, एसएमएस (SMS) आणि कॉलिंगचा (Call) लाभ घेता येणार आहे. याशिवाय युजर्स डिसकाउंट कूपन आणि अतिरिक्त डेटा (Internet Deta) यांसारखे लाभदेखील घेता येणार आहे.

रिचार्ज प्लान कसा आहे ?

जिओचा हा रिचार्ज प्लॅन 2999 रुपयांचा असून, या प्लानमध्ये यूजर्सला एक वर्षाची व्हॅलिडिटी देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच संपूर्ण प्लानमध्ये एकूण 912.5GB डेटा मिळेल. याशिवाय या प्लानमध्ये युजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचाही लाभ घेता येणार आहे. याशिवाय Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चा मोफत लाभ घेता येणार आहे.

जिओच्या या प्लानचे रिचार्ज केल्यानंतर युजर्सना 299 रुपयांचा Zoomin- Mini Magnet चा सेट मोफत दिला जाणार आहे. तथापि, यासाठी युजर्सना कर आणि शिपिंग शुल्क भरावे लागेल.

वरील ऑफर्ससह युजर्सना Ferns & Petals कडून 799 रुपयांच्या खरेदीवर 150 रुपयांची सूट मिळेल. तर, Ajio कडून 2990 रुपये किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर 1000 रुपयांची सवलत देण्यात आली आहे. याशिवाय अर्बन लॅडरमधून 45 हजार रुपयांच्या खरेदीवर 1500 रुपयांची सूट देण्यात येणार आहे.

दुसरीकडे, रिलायन्स डिजिटलचे 1000 रुपयांचे कूपन 500-500 रुपयांचे दोन कूपन युजर्सना उपलब्ध असतील. अशा प्रकारे, युजर्सना एकूण 3699 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.