पारोळा : तालुक्यातील बाभळेनाग शिवारात असलेल्या रिलायन्स जिओ कंपनीच्या टॉवरच्या सुमारे एक लाख रुपयांचा बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली.
या संदर्भात तालुक्यातील सावरखेडा येथील कल्पेश छोटू पाटील यांनी फिर्याद दिली आहे. २८ रोजी सकाळी ७ वाजता नागपूरचा जीओ कंपनी कार्यालयातून मला फोनद्वारे बाभळेनाग शिवारातील सर्व साईट बंद असून त्याची पाहणी करण्यास सांगितले. तेथे गेल्यावर टॉवरची पाहणी केली असता टॉवरच्या २० हजार रुपये या प्रमाणे सुमारे १ लाखांच्या पाच बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पारोळा पोलिसात ३१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पारोळा पोलीस तपास करत आहेत.