जळगाव जिल्हा बँक उपाध्यक्षपदी अमोल पाटील यांची निवड

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज (शनिवार) निवड होत आहे. महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गट यांची संयुक्त सत्ता असून महाविकास आघाडीकडे अध्यक्षपद तर शिंदें गटाकडे उपाध्यक्ष पद निश्चित झाले असून आज दुपारी अमोल चिमणराव पाटील यांची जळगाव जिल्हा बँक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

. तर अध्यक्षपदासाठी रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित मानले जात असून दुपारी एक वाजेनंतर अध्यक्षपद जाहीर करण्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान जिल्हा बँकेच्या सभागृहात आज सकाळी 11 वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात झाली.जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड होत आहे. उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटांचे अमोल चिमणराव पाटील यांच्या नावाची चर्चा होती. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.