अभिनेत्री क्रांती रेडकरचा धक्कादायक खुलासा; अजूनही येतात अंडरवर्ल्डच्या धमक्या !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

क्रांती रेडकर (Kranti Redkar) मराठी सिने शसृष्टीतले गाजलेले नाव, तस पहिले तर ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि पती समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्यांच्या मुळे जास्त चर्चेत असते. क्रांतीचे पती समीर वानखेडे हे फार मोठे उच्च पदस्त पोलिस अधिकारी आहेत. अनेक महत्वाचे विभाग त्यांनी भूषवले आहेत त्यामुळे समीर आणि पर्यायाने क्रांती कायमच चर्चेत राहिले आहेत. आणि खऱ्या अर्थाने ते चर्चेत आले ते शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यनला अटक केल्यावर. एका रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खान अमली पदार्थांचे सेव्हन करताना आढळला म्हणून त्याला समीर वानखेडे यांनी अटक केली होती. यामध्ये नंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाचे नावही पुढे आले होते. या प्रकरणाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

त्यावेळी हे प्रकरण गुन्हेगारी विश्व, अंडरवर्ल्ड इथपर्यंत पोहोचलं. मिडीयामध्येही याची बरीच चर्चा झाली. समीर यांची जात, धर्म सगळंच काढलं गेलं. यामध्ये क्रांती मात्र समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. त्याच प्रकरणावर क्रांतीने पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. एका कार्यक्रमात ती बोलत होती. त्यावेळी क्रांतीला विचारण्यात आलं की लग्नानंतर तुझं आयुष्यात खऱ्या अर्थाने खूपच संघर्षमय झालं आहे. त्यावर क्रांती म्हणजे, ‘दोन गोष्टींचं आम्हाला प्रचंड दडपण असतं एक म्हणजे अंडरवर्ल्ड’ आणि ‘व्यवस्था’.. आजही आमच्या कॉल वर आणि सोशल मीडियावर अंडरवर्ल्डचे धमक्यांचे मेसेज येतात. आम्ही तुम्हाला मारून टाकू, जाळून टाकू, तुमच्या मुलांना, कुटुंबाला नष्ट करू..’ असा खुलासा क्रांतिने कार्यक्रमात केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.