जावई पडला सासूच्या प्रेमात… रात्री भेटायला गेला आणि घडले भलतेच काही

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल कोण कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. याचाच प्रत्येय एका घटनेतून आला आहे. तीन मुलांचा बाप असलेला बाप एका आपल्याच सासूवर प्रेम जडलं. खरं तर सासू देखील त्याच्या प्रेमात पडली होती.

दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की, त्यांना एकमेकांशिवाय राहवत नव्हते. अशातच पत्नी झोपल्यानंतर रविवारी रात्री जावई सासूला भेटण्यासाठी सासूरवाडीला गेला. मात्र, त्याचवेळी सासरच्या मंडळींनी त्याला बघितलं. मग काय सासरच्या मंडळींनी गावकऱ्यांसह या तरुणाला चांगलेच घुतले. एवढेच नाही तर त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार बिहारच्या जमुई जिल्ह्यात घडला आहे.

सासूसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून जावयाची धुलाई करतांनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुनील यादव असं या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाघमा गावातील रहिवासी असलेल्या सुनीलचे कल्ला गावातील एका तरुणीसोबत लागण झाले होते.

काही दिवसांच्या सुखी संसारानंतर या जोडप्याला तीन अपत्ये देखील झाली. मात्र, याच काळात सुनीलचे आपल्या सासूवर प्रेम जडले. त्याचा सासरा आणि मेहुणा बाहेरगावी कामाला असल्याने सुनील आपल्या पत्नीला अंधारात ठेऊन नेहमी सासूला भेटण्यासाठी जात होता.

Leave A Reply

Your email address will not be published.