लोकशाही न्यूज नेटवर्क
वरणगाव-भुसावळ तालुक्यातील हतनुर येथे पोलिसांनी छापा टाकला आहे. विमल गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करत एकूण पंधरा हजारांचा गुटखा जप्त केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील हतनूर येथे विमल गुटखा अवैध्यरित्या विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पो.हे.कॉ रामचंद्र मोरे पो.कॉ अतुल बोदडे, पो.कॉ योगेश पाटील, विजय बावसकर, या पोलीस पथकाने (दि.११) सोमवार रोजी संध्याकाळी गावातील विलास उत्तम चौधरी यांचा मालकीचे लकी किराणा दुकानात छापा टाकला. तसेच दुकानातील सुमारे पंधरा हजार चारशे रुपये किंमतीचा विमल गुटखा जप्त करीत विक्रेत्यास ताब्यात घेतेले. याबाबत वरणगाव पोलिस स्टेशनला पो.कॉ योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून विलास चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.