जामनेर न्यायालयात युवतीचा विनयभंग ; गुन्हा दाखल

0

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील न्यायालयात एका २३ वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी मंगळवारी २१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता एकावर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात २३ वर्षीय तरूणी राहत असून मंगळवारी २१ मार्च रोजी जामनेर न्यायालयात त्यांचे काम असल्याने त्या दुपारी ३ वाजता आलेल्या होत्या. दरम्यान, जितेंद्र कैलास कुमावर रा. नेरी दिगर ता. जामनेर याने तरूणीसह तिच्या सोबत असलेल्या एकाला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला आणि तरूणीला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर न्यायालयाच्या आवारात घडला . तरूणीने जामनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी जितेंद्र कैलास कुमावत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक राजू तडवी पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.