‘टायगर ३’ सिनेमात शाहरुख दिसणार या भूमिकेत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

पठाण या सिनेमावर कित्येक दिवस वाद सुरु होते. पण हाच सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि रेकॉर्ड मोडला. ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमानंतर आता उत्सुकता आहे ती भाईजान (Salman Khan) सलमान खानच्या ‘टायगर ३’ची (Tiger 3). सलमान शाहरुख या जोडी पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. पठाणमध्ये टायगरचा कॅमिओ तर बघितला आता प्रतिक्षा आहे ती टायगरमध्ये पठाणचा कॅमिओ बघण्याची. जसा टायगर चा कॅमिओ हा हिट ठरला तसेच पाठांचा कॅमिओ हिट होण्यासाठी मेकर्स मेहनत घेत आहे.

45 दिवस होणार शूटिंग

‘टायगर ३’ यशराज बॅनर्सच्या टायगर या फ्रँचायझीची तिसरी फिल्म असणार आहे. सिनेमात सलमान शाहरुखचा अॅक्शन सीन ७ दिवसात शूट होईल असं आधी ठरलं होतं. मात्र आता नवीन आलेल्या माहितीनुसार हा अॅक्शन सीन ४५ दिवस शूट होणार आहे. तसेच यासाठी भव्य सेट उभारण्यात येतो आहे. सलमान खान आणि शाहरुख खान पुन्हा सोबत दिसणार आहेत. आदित्य चोप्रा (Aditya Chopra) आणि मनीष शर्मा या सरप्राईज एलिमेंटला आणखी खास बनवण्यासाठी मेहनत करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.