नदी ही मानवाचे जीवन प्रवाहित करणारी व जीवस्रुष्टी देणारी आहे: साधना महाजन

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

नदी ही मानवाचे जीवन प्रवाहित करणारी व त्याच बरोबर जीवस्रुष्टी देणारी आहे. नदी म्हणजे केवळ पाण्याचा स्रोत नसुन आध्यात्मिक समाधानासोबत शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य प्राप्त करून देत असते. नदी म्हणजे संम्रुद्धी नदीच्या संवर्धना विषयी केंद्र सरकारने दिशानिर्देश निश्चित केले आहे. त्या द्रुष्टीने शासनाच्या वतीने धोरण सुद्धा जाहीर केले आहे.

नदी फक्त खळखळून वाहणारी नसुन ती आपल्या देशाचा अमुल्य ठेवा व मालमत्ता आहे. नदीचे संवर्धन करणे व पावित्र्य राखणे हि सुद्धा देशभक्ती करण्यासारखे आहे. स्वच्छ सर्वेक्षण समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. जामनेर नगरपरिषद, जामनेर यांच्या मार्फत स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत माझी वसुंधरा अभियान, २०२२, आजादी का अमृत महोत्सव या अभियानांतर्गत जामनेर शहरातील कांग नदी स्वछता अभियान ३१ जानेवारी २०२२ पासून जामनेर नगरपालिकेच्या वतीने या अभियानाला सुरुवात करण्यात आली होती.

शहरातील नागरिकांना नदीच्या संवर्धन राखण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. नदीमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. साफसफाई करुन संग्रहित केलेला कचरा ट्रॅक्टर व अन्य वाहनाने भरून नेण्यात आला होता.आज दि. ९.२.२०२२ रोजी या जनजागृती अभियानाचा समारोप करण्यात आला होता.

याप्रसंगी नगराध्यक्षा साधना महाजन, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, उपनगरध्यक्ष प्रा. शरद पाटील सर, गटनेते प्रशांत भोंडे, जेष्ठ नेते श्रीराम महाजन, आतिष झाल्टे, रतन गायकवाड, फारूक मणियार, नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख सूरज पाटील, आरोग्य विभाग सहाय्यक गजानन माळी, शहर समन्वयक श्रुतीसागर पाटील, तसेच आणि स्वच्छता कर्मचारी यांनी या अभियानात उस्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच सर्व नगरसेवक व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी या अभियानाविषयी आढावा घेतला. तसेच झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून पुढील कामा संदर्भात संबंधितांना सूचना देण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.