राज्य फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पोलीस जलतरण तलावाच्या जलतरणपटूंचे यश

0

जळगाव ;- पहिली महाराष्ट्र राज्य फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप २०२३ दिनांक ११ जून रोजी बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेत जळगावातील पोलीस जलतरण तलावाच्या जलतरणपटूंनी १७ पदक मिळवत स्पर्धेत आपले वर्चस्व राखले.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी विजय स्पर्धकांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक ( गृह) संदीप गावीत, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस वेल्फेअर निरीक्षक सुनंदा पाटील यांनी देखील स्पर्धकांचे अभिनंदन केले.

या स्पर्धेत पुरुष व महिला गटात हर्षवर्धन लिलाधर महाजन ३ मेडल, धनश्री राजीव जाधव ४ मेडल तर १७ वर्षाखालील मुले- ओम रवींद्र चौधरी ३ मेडल, हर्षल रामदास भोस २ मेडल, १५ वर्षाखालील मुले‌- विमलकीर्ती किशोर मेढे १ मेडल, वैजयंती सुरज दायमा १ मेडल, १३ वर्षाखालील मुले व मुली- तेजस भागवत चौधरी १ मेडल, विराज विवेकानंद साळवे १ मेडल, अथर्व शैलेश चव्हाण १ मेडल, कुमुदिनी सुरज दायमा १ मेडल, श्रुती चंद्रशेखर शिंपी १ मेडल, कादंबरी चंद्रकांत चौधरी १ मेडल, ११ वर्षाखालील मुले – किष्णव विवेकानंद साळवे १ मेडल आदी जलतरणपटू सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.