२६ वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील विजय नगरात राहणाऱ्या पल्लवी महेश पाटील (वय २६) या विवाहितेने राहत्या घरात बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पल्लवी पाटील ह्या पती महेश हेमलाल पाटील यांच्यासह सासू-सासरे व पाच वर्षाची मुलगी यांच्यासह राहतात. पती महेश पाटील हे शहरातील दाणाबाजार मार्केट मधील जळगाव पीपल्स बँकेत क्लार्क म्हणून नोकरीला आहे. तर पल्लवी पाटील ह्या राहत्या घरात खाजगी शाळा सुरू करून उदरनिर्वाह करतात. बुधवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी पती महेश पाटील हे कामावर निघून गेले.

दरम्यान पल्लवी पाटील यांनी घराच्या मागच्या रूममध्ये सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुनबाईने आत्महत्या केल्याचे पाहून सासू व सासरे यांनी हंबरडा फोडला होता. शेजारी राहणाऱ्या नागरीकांसह नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले होते.

याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरुवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. यासंदर्भात प्राथमिक तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहे. मयत विवाहितेच्या पश्चात पती महेश पाटील, सासू अंजनाबाई, सासरे हेमलाल पाटील आणि पाच वर्षाची मुलगी उर्वशी असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.