जळगाव एसटी वर्कशॉपमधून तीन बॅटरी लंपास; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील नेरी नाका येथील एसटी वर्कशॉपच्या आवारातून तीन बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील नेरी नाका येथील एसटी वर्कशॉप येथे शनिवारी २१ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २५ हजार ५०० रुपये किंमतीच्या तीन बॅटरी लंपास केल्या. सदर प्रकार २२ मे रोजी सकाळी ८ वाजता एसटी कर्मचारी विनीत विजयकुमार कुलकर्णी (वय ३४, रा. रामदेव बाबा मंदिराजवळ, भुसावळ जि.जळगाव) यांच्या लक्षात आला. यावेळी विनीत कुलकर्णी त्यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिसरात बॅटरीचा शोध घेतला. मात्र काहीही माहिती मिळाली नाही.

शेवटी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. विजय कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनारा करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.