मुलीला भेटायला जाणाऱ्या पित्याचा रस्त्यातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर येथील सुरेश गावडे यांचे शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास म्हसावदला जात असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुरेश गावडे (वय ५६, रा. हरिविठ्ठल नगर) यांचे वाघनगर परिसरात चहा नाश्त्याचे हॉटेल आहे. शनिवारी 22 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुरेश गावडे हे त्यांची विवाहित मोठी मुलगी वर्षा हिला भेटण्यासाठी त्यांच्या (एम.एच. १९ ए.टी. ४२९९) या क्रमांकाच्या दुचाकीने म्हसावद येथे जात होते.

यादरम्यान शिरसोली जवळ मारुतीच्या मंदिराजवळ त्यांच्या छातील कळा यायला लागल्या. छातील दुखत असल्याने त्यांनी दुचाकी थांबविली व ते मंदिरावर थांबले. याचठिकाणी काही वेळातच मृत्यू झाला. मंदिराजवळ असलेल्या वेफर व्यावसायिकाने मयत हे सुरेश गावडे असल्याची ओळख पटवित, त्यांच्या शिरसोली येथील नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडी पोलिसांनीही घटनास्थळ गाठले व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. मयत सुरेश गावडे यांच्या पश्‍चात दोन मुले महेंद्र व दिपक तसेच सूना, सोनल व मनिषा तसेच तीन नातंवडे असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.