जळगाव महानगरपालिकेत मोठी भरती, असा करा अर्ज

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  जळगाव महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण: 22 जागा

 

पदांचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता 

1) कनिष्ठ अभियंता (बांधकाम) / Junior Engineer (Civil) –  जागा : 10, पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी,  मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

2) कनिष्ठ अभियंता (पाणी पुरवठा) / Junior Engineer (Water supply) – जागा : 03, पात्रता :  मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechincal) अभियांत्रिकी शाखेची पदवी,  मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

3) कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical) – जागा : 04, पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी, मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

4) रचना सहायक / Design Assistant – जागा : 04, पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुविषारद पदवी (B. Arch) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी (B.E.Civil / B.Tech. Civil) शाखेची पदवी, मराठी भाषेसह शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

5) आरेखक / Draftsman – जागा : 02, पात्रता :  शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक कोर्स उत्तीर्ण आवश्यक. किंवा  शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षांचा १ NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण

6) अग्निशमन फायरमन / Fireman – जागा: 15, पात्रता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण, राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम करणे आवश्यक, MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

7) विजतंत्री / Electrician – जागा: 06, पात्रता : शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वीजतंत्री कोर्स उत्तीर्ण आवश्यक. (लगतचे ३ वर्ष) किंवा  शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षाचा NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक, MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

8) वायरमन / Wireman – जागा : 12, पात्रता : शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री कोर्स उत्तीर्ण आवश्यक. किंवा  शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे १ वर्षाचा NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक, MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

9) आरोग्य निरीक्षक / Health Inspector- जागा : 10, पात्रता :  महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण आवश्यक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण,  MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

10) टायपिस्ट/संगणक चालक / Typist/Computer Operator- जागा : 20, पात्रता :  मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C.) उत्तीर्ण,  MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

वयाची अट : 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [सर्व राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : 21,000/- रुपये ते 22,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत 10 वा मजला. सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव – 425001.

जाहिरात : https://drive.google.com/file/d/1hTJ5U9cqJe7LUuFCKmD04aCQCLkAv4q4/view

अधिकृत संकेतस्थळ : http://www.jcmc.gov.in

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.

पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2023 आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

अधिक माहिती http://www.jcmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.