गोलाणी मार्केटमधून काढला तब्बल ७७ टन कचरा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्वच्छता पंधरवडा अंतर्गत शहरात स्वच्छता मोहीम सुरु आहे. सुमारे पाच वर्षांनी महापालिका कर्मचाऱ्यांनी गोलाणी मार्केटची साफसफाई केली. मनपा व गोलाणी मार्केट येथे विशेष स्वच्छता मोहीम  प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या अधिपत्याखाली 18 अधिकारी वर्गाच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाकडील मुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक युनिट प्रमुख व मुकादम  यांचेकडून समन्वय करून  एकूण 305 कामगारांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

सदरील संपूर्ण मार्केटची स्वच्छता मोहीम ही विंग क्रमांक 1 ते 4 वर व आजूबाजूचा मार्केटचा परिसर रस्ते साफसफाई यावेळी  करण्यात आली. यावेळी  प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांनी स्वतः  हजर राहून मोहीम राबविली.  तसेच यावेळी  वेळी सह. आयुक्त गणेश चाटे, सहआयुक्त (आरोग्य) उदय पाटील, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

या मोहिमेद्वारे गोलाणी मार्केटमधून तब्बल ७७ टन कचरा संकलन करण्यात आला. हा कचरा 33 ट्रीप वाहनाद्वारे वाहण्यात आला. अजूनही साफसफाई द्वारे मार्केट वरील गच्चीवर संकलित केलेला कचरा पडून असून  त्याच्या विल्हेवाटीचे उर्वरित काम हे मंगळवार रोजी मनपा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. असे सह आयुक्त (आरोग्य) उदय पाटील यांनी  सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.