रासोयो स्वंयसेवकांनी स्वच्छता मोहिमेतून केले कचरा संकलन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “आझादी का अमृत महोत्सव निमित्त ९ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील प्रत्येकाने आपाआपल्या परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करुन कचरा संकलित केला. आणि तो कचरा कचराकुंडीत टाकला त्याचे प्रमाण म्हणून काही विद्यार्थी स्वयंसेवकांनी फोटो काढले. यात प्रामुख्याने एम. एस. डब्ल्यू. द्वितीय वर्षातील स्वंयसेवक गणेश बाविस्कर आणि  बी.एस.डब्ल्यू प्रथम वर्षाची विद्यार्थिनी शितल धनगर यांचे प्रातिनिधिक स्वरूपात फोटो राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश शांताराम चौधरी यांना व्हाट्सअपला पाठवले.

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी आझादी का अमृत महोत्सवामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात सहभाग नोंदविला.

सदर उपक्रम हा प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांच्या संकल्पनेतून निर्माण झाला. यासाठी महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक हनवते यांचे सहकार्य लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.